National Campaign against the delay in Dabholkar, Pansare and Kalburgi murder case

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 जानेवारी रोजी 41 महिने पूर्ण होत आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने किमान जिल्हा स्तरावर तरी आपापल्या परीने धरणे आंदोलन करून मा. मुख्यमंत्री यांना द्यावयाचे निवेदन संबंधित जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांना द्यावयाचे आहे. तसेच 20 फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे ह्यांच्या खूनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसच्या सर्व शाखांनी समविचारी संघटनांच्या मदतीने 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2017 दरम्यान देशभरात *निषेध कार्यक्रमांचे आयोजन* करावे असे आवाहन राज्य कार्याध्यक्ष *अविनाश पाटील* यांनी केले आहे.

 

निवेदन *विषय: खुनाचा तपास व पुढील कृती कार्यक्रम*
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इतर समविचारी पक्ष, संस्था, संघटना व हितचिंतक यांच्यासह 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2017 दरम्यान 'दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई' संदर्भात *राज्यभर निदर्शने* करणार आहे.
41 महिन्यांच्या तपासातील वास्तव आपल्या समोर आहे. या तपासातील प्रगती, चिंतन व फलित आणि या संदर्भाने भविष्यातील कृती कार्यक्रम आणि मागण्या तसेच, सना संस्थेचं गुन्हेगारी वास्तव सतत बाहेर आणणं आणि त्यांच्या फरार गुन्हेगार साधकांचे फोटो प्रसिद्करत राहणे इत्यादी.
अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपण एक चर्चासत्र आयोजित करत आहोत. चर्चासत्राचा विषय – *दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी खून खटल्यातील प्रचंड विलंब: चिंतन, आकलन, विचारमंथन आणि धोरणनिश्चिती* असा असून यामध्ये अँड. प्रकाश आंबेडकर, जतिन देसाई, दत्ता इसवलकर, अँड. सुरेखा दळवी आणि CPI व CPM चे इतर प्रमुख नेते व इतर समविचारी संघटनांचे प्रमुख नेते सहभागी होत आहेत. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिस चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील असणार आहेत.
 
वेळ:- 19 जानेवारी 2017, संध्या. 5 ते 7 वा.
स्थळ:- मुंबई पत्रकार संघ, आझाद मैदान शेजारी, CST, मुंबई.
सर्व समविचारी साथी व हितचिंतक यांना निमंत्रण आहे.
संपर्क:- अविनाश पाटील (9422790610),  नंदकिशोर तळाशीलकर (9869170062), विजय परब (9869077462).

 

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती.